पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
21 JAN 2026 9:24AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य स्थापना दिनानिमित्त मणिपूरच्या बंधू आणि भगिनींना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
मणिपूरचे लोक त्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाने भारताच्या प्रगतीला समृद्ध करत आहेत. राज्याची खेळांविषयी असलेली आवड, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि निसर्गाशी असलेले जवळचे नाते खरोखरच उल्लेखनीय आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
येणाऱ्या काळात मणिपूर विकासाच्या मार्गावर सातत्याने पुढे जात राहील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
एक्स समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे.
मणिपूर राज्य स्थापना दिनानिमित्त, मी राज्यातील माझ्या बहिणी आणि बंधूंना हार्दिक शुभेच्छा देतो. मणिपूरमधील लोक भारताच्या प्रगतीला समृद्ध करत आहेत. क्रीडा, संस्कृती आणि निसर्गाबद्दल या राज्याची आवड उल्लेखनीय आहे. येणाऱ्या काळातही राज्य विकासाच्या मार्गावर पुढे जात राहो."
NehaKulkarni/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2216719)
अभ्यागत कक्ष : 24
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam