पंतप्रधान कार्यालय
ज्ञानाचे सार समजून घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
20 JAN 2026 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर आज एक गहन अर्थाचे संस्कृत सुभाषित दिले आहे. विशाल ज्ञानसंपदा आणि मर्यादित वेळ यामध्ये ज्ञानाचे सार ओळखण्याच्या कालातीत शहाणपणाचे महत्त्व हे सुभाषित सांगते.
हे संस्कृत सुभाषित —
अनन्तशास्त्रं बहुलाश्च विद्याः अल्पश्च कालो बहुविघ्नता च।
यत्सारभूतं तदुपासनीयं हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात्॥
यामध्ये असा संदेश दिला आहे की प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी असंख्य शास्त्रे आणि ज्ञानाच्या विविध शाखा असल्या तरी मानवी जीवनाला काळ आणि अनेक अडथळ्यांच्या मर्यादा आहेत. त्यामुळे पाणी आणि दूध वेगळे करण्याची क्षमता असल्याचे मानले जाणाऱ्या हंसाप्रमाणे, केवळ ज्ञानाचे सार — अंतिम सत्य — ओळखून तेच आत्मसात करावे.
पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर दिलेला हा संदेश -
“अनन्तशास्त्रं बहुलाश्च विद्याः अल्पश्च कालो बहुविघ्नता च।
यत्सारभूतं तदुपासनीयं हंसो यथा क्षीरमिवाम्बुमध्यात्॥”
* * *
नेहा कुलकर्णी/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2216473)
आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam