गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडून एनडीआरएफच्या जवानांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
19 JAN 2026 1:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2026
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल - एनडीआरएफच्या जवानांना दलाच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
‘एक्स’वरील संदेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले,
“एनडीआरएफच्या जवानांना स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आपत्ती-प्रतिरोधक भारत उभारण्याच्या मोदी सरकारच्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी एनडीआरफची महत्त्वाची भूमिका असून आज हे दल देशाचा आपत्ती काळात विश्वासार्ह आधारस्तंभ ठरले आहे. इतरांच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीदांना माझा सलाम.”
नेहा कुलकर्णी/रेश्मा जठार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2216028)
आगंतुक पटल : 6