पंतप्रधान कार्यालय
नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त, स्टार्टअप इंडिया उपक्रमाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमातील संबोधनाची क्षणचित्रे केली सामायिक
Posted On:
16 JAN 2026 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जानेवारी 2026
नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त, स्टार्टअप इंडिया उपक्रमाला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. आपल्या या संबोधनाची क्षणचित्रे त्यांनी समाजमाध्यमावर सामायिक केली आहेत.
यासंदर्भात X या समाजमाध्यमावर पंतप्रधानांनी एक संदेश मालिका सामायिक केली असून, त्यांनी लिहिलेला संदेश
आज आपण #10YearsOfStartupIndia ची दहावी वर्षपूर्ती साजरी करत आहोत.
गेल्या दशकभरात स्टार्टअप्स जगात अनेक यशोगाथांचे साक्षी राहिले, ही परिसंस्था कशा प्रकारे नवोन्मेष आणि प्रगतीला गती देत आहे, हेच या यशोगाथांमधून दिसून येत आहे.
#10YearsOfStartupIndia ने लोकांच्या प्रदीर्घ काळापासूनच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यात मोठी भूमिका बजावली आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील युवा वर्गाला देखील त्यांची स्वप्ने जोपासणे आणि ती प्रत्यक्षात साकारणे शक्य झाले आहे .
स्टार्टअप इंडिया हे विविधांगी क्षेत्रांना नवीन संधींशी जोडणारे एक ताकदीचे व्यासपीठ आहे.
#10YearsOfStartupIndia
भारताने उदयाला येवू घातलेले नवीन कल आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगाचे नेतृत्व करावे, यासाठी पुढील दहा वर्षांत स्टार्टअप्स जगाताचा सध्याचा वेग अधिक वाढवणे हेच आमचे ध्येय आहे.
#10YearsOfStartupIndia
शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2215505)
अभ्यागत कक्ष : 61
Read this releasein:
English
,
Gujarati
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam