पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ स्वाभिमान पर्वाची क्षणचित्रे केली समायिक
प्रविष्टि तिथि:
11 JAN 2026 10:04PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सोमनाथ येथे आयोजित सोमनाथ स्वाभिमान पर्वाची क्षणचित्रे ‘एक्स’ या समाज माध्यमावर सामायिक केली आहेत.
एक्स वरील वेगवेगळ्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“सोमनाथ हे शाश्वत दिव्यतेचे दीपस्तंभ आहे. त्याची पवित्र उपस्थिती पिढ्यान्पिढ्या लोकांना मार्गदर्शन करत राहिली आहे. कालच्या कार्यक्रमांमधील काही क्षणचित्रे येथे सादर करत आहे, ज्यामध्ये ओंकार मंत्रोच्चार आणि ड्रोन शो यांचा समावेश आहे.
#SomnathSwabhimanParv”
“पावन आणि दिव्य सोमनाथ धाममध्ये दर्शन-पूजन करण्याचे सौभाग्य लाभले. हा अनुभव मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करणारा आहे. भगवान सोमनाथांची कृपा सर्व देशवासीयांवर सदैव राहो, हीच प्रार्थना.”
“सोमनाथ येथे शूर वीर हमीरजी गोहिल यांना आदरांजली अर्पण केली. क्रूरता आणि हिंसाचाराच्या काळात ते धैर्य आणि दृढनिश्चयाचे तेजस्वी प्रतीक म्हणून उभे राहिले. त्यांचे शौर्य आपल्या सभ्यतागत स्मृतीत सदैव कोरलेले राहील. ज्यांना वाटले की बळाच्या जोरावर आपल्या सभ्यतेला तुडवता येईल, अशांना त्यांच्या धैर्यातच कालातीत उत्तर मिळते.”
“आज आपण पाहतो ते सोमनाथ मंदिर महान सरदार पटेल यांच्या प्रयत्नांशिवाय साकार झाले नसते. 1947 मध्ये दीपावलीच्या काळात त्यांनी येथे दिलेल्या भेटीने ते इतके भारावून गेले की, येथे एक भव्य मंदिर उभारण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली. मे 1951 मध्ये मंदिराचे द्वार भक्तांसाठी खुले झाले तेव्हा सरदारसाहेब प्रत्यक्ष उपस्थित नव्हते; मात्र त्यांची अदम्य इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी या दिव्य मंदिर संकुलात स्पष्टपणे प्रतिबिंबित होते.”
“वेगडाजी भिल यांचे शौर्य सोमनाथच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. अमानवी हिंसेच्या धमक्यांना न जुमानता ते या पवित्र मंदिराच्या रक्षणासाठी ठाम उभे राहिले. त्यांच्या जीवनातून हे स्पष्ट होते की सोमनाथची शक्ती नेहमीच भारतमातेच्या असंख्य वीर संततींच्या दृढ संकल्पातूनच निर्माण झाली आहे.”
“सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या शौर्य यात्रेत सहभागी होऊन मला अत्यंत अभिमान वाटतो. या प्रसंगी मंदिराच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या असंख्य वीर सुपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे सौभाग्य लाभले. त्यांचे अदम्य साहस आणि पराक्रम देशवासीयांना सदैव प्रेरणा देत राहतील.”
“सोमनाथमध्ये वीर हमीरजी गोहिल यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते बर्बरता आणि हिंसेच्या काळात साहस आणि दृढ संकल्पाचे प्रतीक ठरले. त्यांचे शौर्य युगानुयुगे देशवासीयांच्या स्मरणात राहील. त्यांचे धैर्य हे सिद्ध करते की भारताची संस्कृती कोणत्याही प्रकारच्या बळाच्या जोरावर कमजोर करता येणार नाही.”
“जर देशाला सरदार पटेलसारखी महान व्यक्ती लाभली नसती, तर आज आपण सोमनाथ मंदिराला या स्वरूपात पाहू शकलो नसतो. 1947 मधील दीपावलीच्या काळातील येथे दिलेल्या भेटीने ते इतके सद्गदित झाले की त्यांनी भव्य मंदिराच्या पुनर्निर्माणाचा संकल्प केला. मे 1951 मध्ये मंदिर भाविकांसाठी खुले झाले तेव्हा सरदार साहेब आपल्यात नव्हते; पण त्यांची अदम्य इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी आजही या दिव्य मंदिर परिसरात स्पष्टपणे दिसून येते.”
“वेगडाजी भिल यांचा पराक्रम सोमनाथच्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहेत. हिंसेच्या धमक्यांपुढे न झुकता त्यांनी या पवित्र मंदिराच्या रक्षणासाठी ठाम भूमिका घेतली. त्यांच्या जीवनातून हे शिकायला मिळते की सोमनाथच्या संरक्षणासाठी भारतमातेच्या संततींचा संकल्प किती मजबूत होता.”
“सोमनाथच्या पवित्र भूमीत ज्या प्रकारे आपल्या मातृशक्तीने सहभाग घेतला, तो मन भारावून टाकणारा आहे. सोमनाथची भव्यता, दिव्यता आणि अखंडतेमध्ये त्यांची भूमिका सदैव महत्त्वाची राहिली आहे.”
“#SomnathSwabhimanParv हा श्रद्धा आणि धैर्याचा उत्सव आहे. सोमनाथ असंख्य बलिदानांच्या आठवणी जपून ठेवतो, ज्या आपल्याला सतत प्रेरणा देतात. हा पर्व दिव्यता आणि आपल्या सभ्यतेच्या महानतेचे प्रतीक आहे. येथे आहेत आजच्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे…”
“सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्ताने मी त्या सर्व वीर-वीरांगनांना नमन करतो, ज्यांनी सोमनाथच्या रक्षणाला आणि मंदिराच्या पुनर्निर्माणाला आपल्या जीवनाचे ध्येय बनवले. त्यांनी हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आपले सर्वस्व महादेवाला समर्पित केले.”
#SomnathSwabhimanParv
“परकीय आक्रमकांद्वारे अनेक शतकांपर्यंत भारताला संपवण्याचे निरंतर प्रयत्न केले गेले आहेत. पण ना सोमनाथ नष्ट झाले, ना भारत!
#SomnathSwabhimanParv”
“सोमनाथ स्वाभिमान पर्व हे इतिहासाच्या गौरवाचे प्रतीक तर आहेच, पण एका कालातीत यात्रेला भविष्याशीसाठी जीवंत बनवण्याचे माध्यम देखील आहे. आपण या संधीचा उपयोग आपले अस्तित्व आणि ओळख अधिक बळकट करण्यासाठी केला पाहिजे.”
#SomnathSwabhimanParv”
“भारताने जगाला हे शिकवले आहे की हृदय जिंकून कसे जगायचे. सोमनाथची हजार वर्षांची गाथा संपूर्ण मानवतेला हाच संदेश देते.
#SomnathSwabhimanParv”
***
NehaKulkarni/ShraddhaMukhedkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2213596)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam