गृह मंत्रालय
सहकारातून पोषण सुरक्षेच्या दिशेने मोठे पाऊल : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ पोषण फाउंडेशनच्या सीएसआर परिषदेचे उद्घाटन होणार
Posted On:
05 JAN 2026 7:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकार से समृद्धि’ या दूरदर्शी संकल्पनेने प्रेरित होऊन आणि केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली, सहकारी चळवळीला जनकल्याण व सामाजिक विकासाशी जोडणारी आणखी एक महत्त्वाचा उपक्रम राबवला जात आहे. या पार्श्वभूमीवर अमित शाह 6 जानेवारी 2026 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे एनडीडीबी (राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ) पोषण फाउंडेशनद्वारा आयोजित सीएसआर (कॉर्पोरेट सामाजिक दायित्व) परिषदेचे उद्घाटन करतील. पोषण सुरक्षेत आणि कुपोषण निर्मूलनात कॉर्पोरेट सामाजिक दायीत्वाची भूमिका हा या परिषदेचा विषय आहे.
या परिषदेत अमित शाह गिफ्टमिल्क कार्यक्रमाच्या तिसरा टप्प्याचे उद्घाटन करतील. हा कार्यक्रम स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) – भिलाई स्टील प्लांट, छत्तीसगड यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत राबवला जात आहे. भिलाई स्टील प्लांटच्या खाण क्षेत्रातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 4,000 विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होईल.
याशिवाय शिशु संजीवनी कार्यक्रमाचा प्रारंभही त्यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम आयडीबीआय बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत राबवला जात आहे. या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 3,000 मुलांना पोषण साहाय्य मिळेल. शिशु संजीवनी हा ऊर्जा-घन, अर्ध-घन, खाण्यास तयार असा पोषक पूरक आहार आहे. हा प्रकल्प एनडीडीबीने विकसित केला असून महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील भंडारा दूध संघात आहार तयार केला जाईल.
ही राष्ट्रीय परिषद विविध मंत्रालयांचे प्रतिनिधी, सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील कंपन्या/सार्वजनिक उपक्रमांचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, दुग्ध सहकारी संस्था, नामांकित संशोधन संस्थांचे वैज्ञानिक तसेच लाभार्थी संस्था (शाळा व अंगणवाडी केंद्रे) यांना एकत्र आणणारे व्यासपीठ ठरेल. मुलांमधील कुपोषणाशी लढण्यासाठी सहकार्यपूर्ण, नाविन्यपूर्ण व शाश्वत धोरणांवर चर्चा करणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
उद्घाटन सत्रानंतर पोषण व आरोग्य : सार्वजनिक हस्तक्षेपातून कुपोषण निर्मूलन आणि कॉर्पोरेट–सहकार सहकार्याद्वारे पोषण सुरक्षा या दोन विषयांवर सत्रे होणार आहेत. या कार्यक्रमाला देशभरातून सुमारे 1,200 सहभागी उपस्थित राहतील.
* * *
निलिमा चितळे/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2211618)
अभ्यागत कक्ष : 60
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada