गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वातंत्र्य सेनानी शहीद उधम सिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
26 DEC 2025 4:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2025
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी, शहीद उधम सिंह यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
‘एक्स’ या समाज माध्यमावरील एका संदेशात, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, अमर शहीद उधम सिंह यांनी जालियनवाला बाग हत्याकांडात शहीद झालेल्या देशबांधवांचा बदला घेण्यासाठी अतुलनीय साहस आणि शौर्य दाखवले. उधम सिंह जी यांनी गदर चळवळीद्वारे भारतीय स्वातंत्र्यलढ्याची ज्वाळा परदेशात पसरवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली, असेही ते म्हणाले. त्यांच्या शौर्याची गाथा देशातील तरुणांसाठी प्रेरणेचा एक अक्षय स्रोत आहे, जी सर्वांच्या हृदयात मातृभूमीबद्दल निष्ठेची खोल भावना जागृत करते.
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2208876)
आगंतुक पटल : 40
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam