पंतप्रधान कार्यालय
26 डिसेंबर रोजी 'वीर बाल दिवस' निमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार
प्रविष्टि तिथि:
25 DEC 2025 8:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 12:15 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे 'वीर बाल दिवस' निमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याप्रसंगी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील.
'वीर बाल दिवस' साजरा करण्यासाठी, भारत सरकार देशभरात विविध सहभागी कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. साहिबजादे यांच्या विलक्षण धैर्याबद्दल आणि सर्वोच्च बलिदानाबद्दल नागरिकांना माहिती देणे आणि शिक्षित करणे, तसेच भारताच्या इतिहासातील तरुण वीरांच्या अदम्य साहस, त्याग आणि शौर्याचा सन्मान व स्मरण करणे हा यामागचा उद्देश आहे. या उपक्रमांमध्ये कथाकथनाचे सत्र, काव्यवाचन, भित्तिपत्रक बनवणे आणि निबंध लेखन स्पर्धांचा समावेश असेल. हे कार्यक्रम शाळा, बाल संगोपन संस्था, अंगणवाडी केंद्रे आणि इतर शैक्षणिक मंचांवर, तसेच MyGov आणि MyBharat पोर्टलद्वारे ऑनलाइन माध्यमांतून आयोजित केले जातील.
9 जानेवारी 2022 रोजी गुरु गोविंद सिंग जी यांच्या प्रकाश पूरब प्रसंगी, 26 डिसेंबर हा दिवस गुरु गोविंद सिंग जी यांचे सुपुत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा बाबा फतेह सिंग जी यांच्या हौतात्म्याचे स्मरण करण्यासाठी 'वीर बाल दिवस' म्हणून पंतप्रधानांनी जाहीर केला असून त्यांचे अतुलनीय बलिदान आजही पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत आहे.
या कार्यक्रमाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेतेदेखील उपस्थित राहणार आहेत.
* * *
निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2208607)
आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
Bengali
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam