पंतप्रधान कार्यालय
भारताचे मुक्त व्यापार करार हे अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या व्यापक मोहिमेचा भाग आहेत यावरचा एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
23 DEC 2025 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे. भारताचे मुक्त व्यापार करार हे शुल्क कपातीपलीकडे जाऊन अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि लाखो लोकांचे जीवन सुधारण्यासाठीच्या व्यापक मोहिमेचा भाग आहेत, असे या लेखात स्पष्ट केले आहे. "भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार हा एक ऐतिहासिक टप्पा आहे कारण हा भारताचा पहिला महिलांच्या नेतृत्वाखालील मुक्त व्यापार करार आहे. जवळजवळ संपूर्ण वाटाघाटी करणाऱ्या चमूत महिलांचा समावेश होता", असे मोदी म्हणाले.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या X वरील पोस्टला प्रतिसाद देताना मोदी म्हणाले:
"या अभ्यासपूर्ण लेखात, केंद्रीय मंत्री @PiyushGoyal स्पष्ट करतात की आजचे भारताचे मुक्त व्यापार करार हे शुल्क कपातीपलीकडे असून ते अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि लाखो लोकांचे जीवन सुधारण्यासाठीच्या एका व्यापक मोहिमेचा भाग आहेत.
त्यांनी अधोरेखित केले की भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार हा एक ऐतिहासिक टप्पा आहे कारण हा भारताचा पहिला महिला-नेतृत्वाखालील मुक्त व्यापार करार आहे. जवळजवळ संपूर्ण वाटाघाटी करणाऱ्या चमूमध्ये महिलांचा समावेश होता."
* * *
निलिमा चितळे/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2207759)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam