गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे केले स्वागत
मोदी सरकारची व्यापार मुत्सद्देगिरी यशाचे नवे टप्पे गाठत आहे - अमित शाह
प्रविष्टि तिथि:
22 DEC 2025 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी भारत आणि न्यूझीलंडमधील मुक्त व्यापार कराराचे स्वागत केले आहे. हा यशस्वी करार म्हणजे मोदी सरकारची व्यापार मुत्सद्देगिरी असून, त्यामुळे यशाचे नवे टप्पे गाठले जात असल्याचे त्यांनी X या समाजमाध्यमावरील आपल्या संदेशात म्हटले आहे.
भारत आणि न्यूझीलंडमधील मुक्त व्यापार करारामुळे 20 अब्ज डॉलरची गुंतवणूक येणार असून, यामुळे भारतातील नवोन्मेषक , उद्योजक, शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, विद्यार्थी आणि युवा वर्गासाठी लाभदायक संधी उपलब्ध होतील, यामुळे समृद्धीची नवीन दारे उघडतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील लोककेंद्री परराष्ट्र धोरण नागरिकांच्या आकांक्षा कशारितीने पूर्ण करत आहे, याचे हे एक सर्वोत्तम उदाहरण आहे. असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
* * *
निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2207571)
आगंतुक पटल : 7