गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांनी पंडित रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान आणि रोशन सिंह यांच्या बलिदान दिनानिमित्त वाहिली श्रद्धांजली


‘काकोरी ट्रेन ॲक्शन’द्वारे त्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्यलढ्याला नवी ऊर्जा मिळाली आणि ब्रिटिश सत्तेच्या पायाला हादरा बसला

या स्वातंत्र्यसैनिकांनी देशातील संसाधने तसेच कष्टकरी जनतेने निर्माण केलेली संपत्ती यांवर खरा हक्क जनतेचाच आहे, हा दृढ संकल्प अधोरेखित केला

इतर क्रांतीकारकांसाठी धैर्य आणि शौर्याची प्रेरणा देणारे हुतात्मे; राष्ट्र कधीही विसरणार नाही

प्रविष्टि तिथि: 19 DEC 2025 11:55AM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह व सहकारमंत्री श्री अमित शहा यांनी पंडित रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान आणि रोशन सिंह यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. काकोरी ट्रेन ॲक्शनद्वारे स्वातंत्र्यलढ्याला नवी ऊर्जा देणाऱ्या आणि ब्रिटिश राजवटीचा पाया हादरवून सोडणाऱ्या त्यांच्या बलिदानाचा त्यांनी गौरव केला.

एक्सवरील एका संदेशात केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा म्हणाले की, आपल्या बलिदानाने तसेच काकोरी ट्रेन ॲक्शनद्वारे स्वातंत्र्यलढ्याला नवी ऊर्जा देणारे आणि आणि ब्रिटिश सत्तेचा पाया हादरवणारे पंडित रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान आणि रोशन सिंह यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या स्वातंत्र्यवीरांनी देशाची साधनसंपत्ती आणि जनतेने परिश्रमाने निर्माण केलेल्या वस्तू या येथील जनतेच्याच आहेत, असे त्यांनी सांगितल्याचे शाह म्हणाले. इतर क्रांतिकारकांसाठी ते धैर्य व शौर्याचे प्रेरणास्थान ठरले, असे म्हणत राष्ट्र या हुतात्म्यांना कधीही विसरणार नाही, असे शहा म्हणाले.

***

नितीन फुल्लुके/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2206585) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam