पंतप्रधान कार्यालय
मथुरेत यमुना द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
पंतप्रधानांकडून पीडितांना मदतीची घोषणा
Posted On:
16 DEC 2025 3:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे यमुना द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मोदी यांनी या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येक मृताच्या वारसाला 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील.
पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर पोस्ट केलेः
“उत्तर प्रदेशातील मथुरा येथील यमुना द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातामुळे झालेली जीवितहानी अत्यंत दुःखदायक आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होण्यासाठी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या वारसाला 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील.: PM @narendramodi”
नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2204653)
अभ्यागत कक्ष : 30
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam