पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

NIPER अहमदाबादच्या उद्घाटनाबद्दल पंतप्रधानांनी पाठवला अभिनंदनपर संदेश

Posted On: 30 SEP 2023 8:46PM by PIB Mumbai

 

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते NIPER अहमदाबादचे उद्घाटन झाल्याबद्दल पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी अभिनंदनाचा संदेश पाठवला आहे.

NIPER अहमदाबाद हे ज्ञान, विज्ञान आणि संशोधन यांना  सांधणारा सशक्त पूल म्हणून काम करून भारताला औषधनिर्माण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास पंतप्रधानांनी या संदेशात व्यक्त केला आहे.

त्यांनी 'X' या समाजमाध्यमावर टिप्पणी करताना म्हटले:

"खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा! मला विश्वास वाटतो की अहमदाबादचे NIPER ज्ञान-विज्ञान आणि संशोधन यांना साधणारा सशक्त पूल बनून भारताला औषधनिर्माण क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल."

***

आशिष सांगळे / आशुतोष सावे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2203697) अभ्यागत कक्ष : 24