माहिती आणि प्रसारण मंत्रालय
प्रसार भारतीची एआय वाद्यवृंद त्रिलोकसोबत भागीदारी नाही, राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी राज्यसभेत दिली माहिती
प्रविष्टि तिथि:
12 DEC 2025 2:53PM by PIB Mumbai
प्रसार भारतीने आकाशवाणी, दूरदर्शन किंवा प्रसार भारतीचा ओटीटी मंच वेव्हज यावर आशय प्रसारीत करण्याबाबत कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सहाय्याने निर्मित ‘त्रिलोक’ या वाद्यवृंदासोबत कोणतीही भागीदारी अथवा करार केलेला नाही.
एआयद्वारा निर्मित काही भक्तीगीते प्रसार भारतीच्या वाहिन्यांसह वेव्हज या ओटीटी मंचावर यावर्षी दुर्गा नवरात्रीच्या काळात प्रसारीत करण्यात आली होती. कोणताही आर्थिक तसंच पुन्हा प्रसारण करण्याचा करार न करता प्रायोगिक तत्त्वावर हे प्रसारण करण्यात आले होते.
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी राज्यसभेत एस. निरंजन रेड्डी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली.
***
निलिमा चितळे/सुरेखा जोशी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2203116)
आगंतुक पटल : 9