माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रसारण सेवा (नियमन) विधेयक, 2023 चा मसुदा : भागधारकांशी सल्लामसलत पूर्ण; सरकारचा व्यापक आणि विस्तृत सल्लामसलतींवर विश्वास आहे, असे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांचे प्रतिपादन

प्रविष्टि तिथि: 05 DEC 2025 1:47PM by PIB Mumbai

 

प्रसारण सेवा (नियमन) विधेयक, 2023 (बीएसआर विधेयक) चा मसुदा 10.11.2023 रोजी सार्वजनिक करण्यात आला. सामान्य जनता आणि भागधारकांकडून 09.12.2023 पर्यंत मते/टिप्पण्या/सूचना मागवण्यात आल्या होत्या, हा कालावधी नंतर 15.01.2024 पर्यंत वाढविण्यात आला.

प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योग संघटनांसह इतर भागधारकांकडून मिळालेल्या विविध सूचनांच्या आधारे सरकारने टिप्पणी कालावधी 15.10.2024 पर्यंत वाढवला.

सर्व भागधारकांकडून मिळालेल्या सूचना तपासण्यात आल्या आहेत. मंत्र्यांनी स्पष्ट केले की सरकारचा व्यापक आणि विस्तृत सल्लामसलतींवर विश्वास आहे.

साकेत गोखले यांच्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरादाखल माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज ही माहिती राज्यसभेत सादर केली.

***

सोनाली काकडे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2199351) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali-TR , Kannada