गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी महान राष्ट्रभक्त आणि अमर शहीद खुदिराम बोस यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
शौर्य, साहस आणि मातृभूमीसाठी केलेल्या त्यागाचे प्रतीक असलेल्या खुदिराम बोस यांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठीच्या सशस्त्र क्रांतीदरम्यान युवकांना संघटित केले आणि देशवासियांना स्वदेशीबद्दल जागृत केले
अगणित क्रांतिकारांकांकडून प्रेरणा घेतलेल्या खुदिराम जी यांना ब्रिटिशांची जुलुमी राजवट, क्रांतीच्या मार्गापासून परावृत्त करु शकली नाही, त्यांनी मातृभूमीसाठी आनंदाने आपल्या प्राणांचे बलिदान दिले
खुदिराम बोस यांच्या शौर्याची गाथा सर्व युवकांसाठी राष्ट्र सर्वप्रथम या ध्येयाने प्रेरित होण्यासाठी एक अमूल्य प्रेरणास्रोत आहे
प्रविष्टि तिथि:
03 DEC 2025 3:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी महान देशभक्त आणि अमर शहीद खुदीराम बोस जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.
अमित शाह यांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे :
शौर्य, साहस आणि मातृभूमीसाठी केलेल्या त्यागाचे प्रतीक असलेल्या खुदिराम बोस यांनी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठीच्या सशस्त्र क्रांतीदरम्यान युवकांना संघटित केले आणि देशवासियांना स्वदेशीबद्दल जागृत केले. अगणित क्रांतिकारांकांकडून प्रेरणा घेतलेले खुदिराम जी ब्रिटिश सत्तेच्या पुढे न झुकता कधीही क्रांतीच्या मार्गावरून विचलित झाले नाहीत आणि त्यांनी मातृभूमीसाठी आनंदाने आपल्या प्राणांचे बलिदान दिले. खुदिराम बोस यांच्या शौर्याची गाथा सर्व युवकांसाठी राष्ट्र सर्वप्रथम या ध्येयाने प्रेरित होण्यासाठी एक अमूल्य प्रेरणास्रोत आहे, असे शाह यांनी म्हटले आहे.
नितीन फुल्लुके /भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2198150)
आगंतुक पटल : 4
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali-TR
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam