पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी बीएसएफ स्थापना दिनानिमित्त सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या
प्रविष्टि तिथि:
01 DEC 2025 4:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025
सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी म्हणाले की बीएसएफ हे भारताच्या अविचल निर्धाराचे आणि पराकोटीच्या व्यावसायिकतेचे प्रतीक आहे. “बीएसएफचे जवान अत्यंत आव्हानात्मक प्रदेशांमध्ये सेवा बजावतात. त्यांच्या धैर्यासोबतच त्यांची मानवतावादी भावना देखील विलक्षण आहे,” असे मोदी म्हणाले.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात :
“बीएसएफच्या स्थापना दिनानिमित्त, बीएसएफच्या सर्व जवानांना माझ्या शुभेच्छा. बीएसएफ हे भारताच्या अविचल निर्धाराचे आणि पराकोटीच्या व्यावसायिकतेचे प्रतीक आहे. त्यांची कर्तव्यभावना अनुकरणीय आहे. काही सर्वात आव्हानात्मक प्रदेशांमध्ये हे जवान सेवा बजावतात. त्यांच्या धैर्यासोबतच त्यांची मानवतावादी भावना देखील विलक्षण आहे. आपल्या देशाची सेवा आणि संरक्षण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला माझ्या शुभेच्छा.”
@BSF_India
सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2197006)
आगंतुक पटल : 7