पंतप्रधान कार्यालय
जेनझीने वाहून नेला केटीएस-4.0 चा सांस्कृतिक रथ- तमिळनाडू ते काशीपर्यंत प्रवासाचे युवकांनी आनंदयात्रेत केले रुपांतर
पथनाट्यांपासून रील मेकिंगपर्यंत – जेन झी बनला काशी तमिळ संगममचा नवा चेहरा
प्रविष्टि तिथि:
30 NOV 2025 6:56PM by PIB Mumbai
काशी तमिळ संगमम् 4.0 या महोत्सवाच्या 2 डिसेंबर पासून होत असलेल्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर त्यासाठी सज्ज होत असलेल्या जेन झी म्हणजे डिजिटल युगात जन्माला आलेल्या युवा पिढीमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. काशी आणि तमिळनाडू यांच्यातील प्राचीन सांस्कृतिक आणि भाषिक बंधांना तरुण पिढीच्या उत्साही ऊर्जेशी जोडणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

29 नोव्हेंबर रोजी कन्याकुमारी येथून विशेष रेल्वेने आपला प्रवास सुरू केलेल्या पहिल्या प्रतिनिधी मंडळात मोठ्या संख्येने जेन झी विद्यार्थी सहभागी आहेत. या लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाचे रूपांतर खेळ, सामूहिक उपक्रम, उत्साही गप्पागोष्टी आणि रचनात्मक सहकार्याने भरलेल्या एका सांस्कृतिक आनंदमय प्रवासात झाले आहे, ज्यामुळे हा अनुभव तरुणांसाठी संस्मरणीय आणि अर्थपूर्ण ठरत आहे.
या विशेष रेल्वेतून प्रवास करत असलेल्या तमिळनाडूच्या अर्चना हिने काशी तमिळ संगमम् 4.0 मध्ये सहभागी होण्याचा आपला उत्साही अनुभव व्यक्त केला. ती म्हणाली की, तिला घरी मंदिरात जाण्याची संधी क्वचितच मिळते आणि म्हणूनच ही संधी ती एक दैवी आशीर्वाद मानते. काशीचा समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा पहिल्यांदा अनुभवण्यासाठी ती उत्सुक आहे.
या विशेष गाडीतून प्रवास करत असलेल्या तिरुप्पूरच्या मालती या यूपीएससीची तयारी करत असलेल्या आणखी एका विद्यार्थिनीने, सांगितले की, तमिळनाडू आणि काशी यांच्यात एक सखोल आध्यात्मिक बंध आहे, ज्याचे गुणगान माणिक्कवासागर सारख्या संतांनी शतकानुशतके केले आहे. काशी तमिळ संगमम्, एका आधुनिक, गतिमान स्वरूपात तो बंध अधिक मजबूत करत आहे आणि काशीला भेट देणे हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे तिने सांगितले.
दरम्यान, काशीमध्ये, घाटांवर आणि विद्यापीठांच्या संकुलात सुरू असलेल्या महोत्सवपूर्व उपक्रमांमध्ये जेनझीच्या उत्साही सहभागाने वेगळीच रंगत आली आहे. 'रन फॉर KTS 4.0' सारख्या कार्यक्रमांनी मोठ्या संख्येने तरुणांना आकर्षित केले. त्यांनी केवळ तंदुरुस्तीलाच प्रोत्साहन दिले नाही, तर आगामी सांस्कृतिक उत्सवाविषयी जागरूकता पसरविण्यातही मदत केली.
विश्वनाथ मंदिर परिसरात आणि विविध घाटांवर सादर झालेल्या पथनाट्यांनी जेनझीच्या सर्जनशील अभिव्यक्तीचे दर्शन घडवले, ज्यातून काशी आणि तमिळनाडूचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध एका ताज्या, कलात्मक पद्धतीने सादर करण्यात आला. रील-मेकिंग स्पर्धांनी या उत्साहात आणखी भर घातली आहे. कारण तरुण निर्माते या कार्यक्रमाची झलक समाज माध्यमांवर सामायिक करत आहेत— ज्यामुळे देशभरातील तरुणांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याने त्यांच्या सहभागात वाढ होत आहे.
“तमिळ शिका – तमिळ करकलम” ही या वर्षीच्या काशी तमिळ संगमम् 4.0 ची संकल्पना आहे. भाषा आणि संस्कृती लोकांच्या अधिक जवळ आणणे हा तिचा उद्देश आहे. जेनझी च्या सक्रिय सहभागामुळे ही संकल्पना अधिक सुसंगत आणि प्रभावशाली बनत आहे.
***
सुषमा काणे/शैलेश पाटील/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2196665)
आगंतुक पटल : 53
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
हिन्दी
,
English
,
Manipuri
,
Gujarati
,
Malayalam
,
Urdu
,
Bengali
,
Assamese
,
Telugu
,
Kannada
,
Punjabi
,
Odia
,
Tamil