पंतप्रधान कार्यालय
रायपूर येथे आयोजित डीजीपी आणि आयजीपी परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवले अध्यक्षपद
Posted On:
29 NOV 2025 8:24PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रायपूरमध्ये पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. या परिषदेत भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चा झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. हा मंच राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती आणि नवोन्मेष सामायिक करण्यासाठी एक महत्त्वाचा व्यासपीठ म्हणून काम करतो, हे त्यांनी अधोरेखित केले.
X या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“रायपूरमधील डीजीपी/आयजीपी परिषदेच्या पहिल्या दिवशी भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चा झाली. या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती आणि नवोन्मेष सामायिक करण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे.”
***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2196457)
अभ्यागत कक्ष : 39
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam