पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 25 नोव्हेंबर रोजी कुरुक्षेत्रला देणार भेट
श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी
पंतप्रधान यानिमित्ताने एक विशेष नाणे आणि स्मृतिचिन्ह तिकीट करणार जारी
गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीद दिनानिमित्त भारत सरकार वर्षभर साजरा करीत आहे स्मृती कार्यक्रम
पंतप्रधान ज्योतिसर येथील महाभारत अनुभव केंद्राला देणार भेट आणि 'पांचजन्य'चे करणार उद्घाटन
Posted On:
24 NOV 2025 2:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 नोव्हेंबर रोजी हरियाणातील कुरुक्षेत्राला भेट देणार आहेत.
दुपारी 4:00 वाजता पंतप्रधान भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र शंखाच्या सन्मानार्थ नव्याने बांधलेल्या 'पांचजन्य'चे उद्घाटन करतील. त्यानंतर ते महाभारत अनुभव केंद्राला भेट देतील, हे एक तल्लीन करणारे अनुभव केंद्र आहे जिथे महाभारतातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे चित्रण केले आहे जे त्याचे शाश्वत सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करतात.
दुपारी 4:30 वाजता पंतप्रधान नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीद दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात सहभागी होतील. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान आदरणीय गुरुंच्या 350 व्या शहीद दिनानिमित्त एक विशेष नाणे आणि स्मारक तिकिट जारी करतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील. गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीद दिनानिमित्त भारत सरकार वर्षभर स्मरणोत्सव साजरा करीत आहे.
नंतर संध्याकाळी 5:45 वाजता पंतप्रधान श्रीमद् भगवद्गीतेच्या दिव्य प्रकटीकरणाशी संबंधित भारतातील सर्वात पवित्र तीर्थस्थळांपैकी एक असलेल्या ब्रह्मसरोवर येथे दर्शन आणि पूजा करतील. ही भेट 15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान कुरुक्षेत्रात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाच्या अनुषंगाने आहे.
* * *
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2193516)
Visitor Counter : 10
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam