पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जोहनिबर्ग येथे जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट

Posted On: 23 NOV 2025 9:41PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 नोव्हेंबर 2025

 

दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथे सुरु असलेल्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि कॅनडामधील भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला. 

‘ऑस्ट्रेलिया-कॅनडा-भारत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष (एसीआयटीआय) भागीदारी’ ला सहमती मिळाल्याचेही दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. यामुळे अत्यावश्यक तंत्रज्ञान, अणुऊर्जा, पुरवठा साखळीतील विविधीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमधील त्रिपक्षीय सहकार्याला चालना मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दोन्ही नेत्यांनी जी-7 शिखर परिषदेच्या निमित्ताने जून 2025 मध्ये कॅनानॅस्किस इथे झालेल्या भेटीनंतर, तसेच परराष्ट्र मंत्र्यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये द्विपक्षीय संबंधांसाठी नवीन मार्गदर्शक आराखडा लागू केल्यापासून, दोन्ही देशांमधील संबंधांना मिळालेल्या नव्या गतीचीही त्यांनी प्रशंसा केली. यावेळी दोन्ही पंतप्रधानांनी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, शिक्षण, अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच ऊर्जा क्षेत्रातील परस्पर सहकार्याबद्दल चर्चा केली. पंतप्रधान कार्नी यांनी भारतात फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेच्या आयोजनाला समर्थन दर्शविले.

2030 पर्यंत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार दुप्पटीने वाढवून 50 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने, महत्वाकांक्षी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर वाटाघाटी सुरू करण्याबद्दलही दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. यावेळी दोन्ही देशांनी परस्परांमधील दीर्घकालीन नागरी अणुऊर्जा सहकार्यास पुन्हा अधोरेखित केले तसेच दीर्घकालीन युरेनियम पुरवठा व्यवस्थेच्या माध्यमातून ही सहकार्यपूर्ण भागिदारी वृद्धींगत करण्यावर सुरू असलेल्या चर्चांची दखलपूर्ण नोंदही घेतली.

नियमित उच्च स्तरीय देवाणघेवाणीच्या महत्त्वही दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी पंतप्रधान कार्नी यांना भारताला भेट देण्याचे निमंत्रणही दिले.

 

* * *

नितीन फुल्लुके/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2193473) Visitor Counter : 4