पंतप्रधान कार्यालय
भारत सरकार, ऑस्ट्रेलिया सरकार आणि कॅनडा सरकार यांच्यातर्फे संयुक्त निवेदन
Posted On:
22 NOV 2025 10:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2025
भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांनी आज ‘ऑस्ट्रेलिया-कॅनडा-भारत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष (एसीआयटीआय) भागीदारी’ नामक एका नव्या त्रिपक्षीय तंत्रज्ञान आणि नवोन्मेष भागीदारी करण्याबाबत सहमती दर्शवली.
सध्या अस्तित्वात असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांना पूरक ठरावे म्हणून तिन्ही देशांमध्ये असलेली महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांमध्ये सहकार्याची आकांक्षा बळकट करण्यावर या देशांनी सहमती दर्शवली.
सदर उपक्रम तिन्ही देशांच्या नैसर्गिक ताकदींचा वापर करेल आणि त्यात हरित उर्जा नवोन्मेष तसेच महत्त्वपूर्ण खनिजांसह लवचिक पुरवठा साखळ्या उभारण्यावर अधिक भर दिला जाईल. याद्वारे या देशांच्या संबंधित आकांक्षा तसेच शून्य उत्सर्जनाच्या दिशेने धोरणात्मक सहयोग आणखी दृढ होईल तसेच सुरक्षित, शाश्वत आणि लवचिक भविष्यासाठी पुरवठा साखळ्यांच्या आणखी वैविध्यीकरणाला चालना मिळेल. आपल्या नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी ही भागीदारी, कृत्रिम बुद्धीमत्तेचा विकास आणि सार्वत्रिक स्वीकार यांचे देखील परीक्षण करेल.
या उपक्रमाला गती देण्यासाठी आगामी 2026 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अधिकाऱ्यांची भेट घालून देण्यासाठी तिन्ही देशांनी संमती दिली.
सुषमा काणे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2193051)
Visitor Counter : 6