इफ्फी राजदूतांच्या गोलमेज परिषदेत भारताने सह-निर्मितीची क्षमता प्रदर्शित केली, सांस्कृतिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य अधिक दृढ करण्याचे केले आवाहन
भारत 'जगाचा स्टुडिओ' म्हणून उदयास येण्यास सज्ज आहे : राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि सचिव संजय जाजू
राजदूतांनी भारताची प्रतिभा, तंत्रज्ञान आणि सह-निर्मिती संधींची केली प्रशंसा
#IFFIWood, 21 नोव्हेंबर 2025
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने आज डोना पॉवला स्थित ताज सीदा दि गोवा हेरिटेज हॉटेल येथे आयोजित राजदूतांच्या गोलमेज परिषदेसाठी राजदूतांना एकत्र आणले. या सत्रात सह-निर्मितीच्या संधी, सर्जनशील-अर्थव्यवस्था विकास आणि सखोल सांस्कृतिक देवाणघेवाणीवर भर देत द्विपक्षीय दृकश्राव्य सहकार्याला चालना देण्यासाठी नवीन मार्गांचा शोध घेण्यात आला.
भारत आणि भागीदार राष्ट्रांमधील संवादासाठी एक जागा म्हणून परिकल्पित ही गोलमेज बैठक चित्रपट निर्मिती, तंत्रज्ञान भागीदारी आणि नियामक सामंजस्य यामधील उदयोन्मुख शक्यतांवर केंद्रित होती ज्याद्वारे जागतिक सर्जनशील परिसंस्था मजबूत केली जाऊ शकेल. सह-निर्मिती करारांद्वारे आर्थिक मूल्य निर्धारण , सांस्कृतिक आणि तंत्रज्ञान देवाणघेवाणीत वाढ, परदेशातील चित्रपट निर्मात्यांसाठी नियामक आव्हाने कमी करणे आणि अधिकाधिक परस्पर जोडलेले सर्जनशील परिदृश्य निर्माण करणे यावर चर्चा केंद्रित होती.

गोलमेज परिषदेत स्वागतपर भाषण करताना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी भारतातील वेगाने विस्तारणाऱ्या माध्यम वातावरणावर आणि निर्मिती केंद्र म्हणून त्याच्या वाढत्या आकर्षणाचा उल्लेख केला.
देशाची बहुभाषिक प्रतिभा आणि जिथे जागतिक कथांची कल्पना, निर्मिती आणि सामायिकरण करता येईल, असा जगाचा स्टुडिओ म्हणून भारताचा उदय यावर भर देत त्यांनी नमूद केले की ही गोलमेज परिषद "सांस्कृतिक बंध मजबूत करण्यास आणि भागीदारी वाढविण्यास मदत करेल".
जाजू यांनी विविध चित्रीकरण स्थळांपासून ते प्रगत अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स स्टुडिओपर्यंत भारताची ताकद अधोरेखित केली आणि इफ्फी चे प्रमुख व्यासपीठ असलेल्या वेव्ह्ज फिल्म बाजार येथे उपलब्ध असलेल्या संधींचा शोध घेण्यासाठी प्रतिनिधींना आमंत्रित केले. भारतासोबत भागीदारी केल्यामुळे मोठ्या संख्येने जागतिक समुदायापर्यंत पोहोचता येते, ज्यामुळे कथा विविध संस्कृती आणि बाजारपेठांमध्ये निर्बाधपणे पोहचू शकतात यावर त्यांनी भर दिला.

माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन हे या गोलमेज परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. दृकश्राव्य जगतातील परस्पर सहकार्याला बळकटी देण्याच्यादृष्टीने सहनिर्मिती हा सर्वात शक्तिशाली मार्ग आहे, असे ते म्हणाले. व्हिएफएक्स, अॅनिमेशन आणि भविष्यातील निर्मितीविषयक तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतात गुणाकारीय पद्धतीने वाढ होऊ लागली आहे, यामुळे 2025 पर्यंत भारताचे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र 31.6 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहचेल असा अंदाज त्यांनी मांडला.
विकास आणि निर्मितीचे संयुक्त उपक्रम, सुलभ परवाना पद्धती, प्रतिभावान व्यक्ती आणि संसाधने आणि प्रतिभेची सुलभ देवाणघेवाण सुरळीतपणे व्हावे यासाठी, तसेच चित्रपटकारांसाठी विस्तारीत सर्जनशील स्वातंत्र्य उपलब्ध व्हावे यासाठी द्विपक्षीय करार महत्वाची भूमिका बजावतात, ही बाब त्यांनी अधोरेखीत केली. जागतिक निर्मितीसाठी सुरक्षित परिसंस्था सुनिश्चित करता यावे यासासाठी केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, गृह मंत्रालय अशा विविध मंत्रालयांमध्ये आंतरमत्रालयीन परस्पर भागिदारी घडवून आणली आहे, आणि अशा भागिदारीच्या माध्यमातून पायराविरुद्धच्या उपाययोजनांना बळकटी दिली आहे असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या सल्लागार श्रुती राजकुमार यांनी, पायरसी विरोधात भारताच्या सकारात्मकतेने बदलत गेलेल्या पायरसी विरोधी धोरणाचा आराखडा या गोलमेज परिषदेत मांडला. त्यांनी डिजिटल गळती रोखण्यासाठी आणि आशय सामग्रीची मालिकी असणाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी आखलेल्या तंत्रज्ञानाधारीत उपाययोजना आणि धोरणात्मक पातळीवर उभ्या केलेल्या व्यवस्थेचे तपशील त्यांनी आपल्या सादरीकरणातून मांडले.

क्युबा आणि नेपाळचे राजदूत, तसेच इस्रायल, गयाना, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, मोरोक्को, टोगो आणि कोट डी’आयव्हरचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ राजनैतिक दूतही या गोलमेज परिषदेत सहभागी झाले होते. त्यांनी या विषयाच्या संदर्भाने आपापल्या देशांतील चित्रपट उद्योगक्षेत्राबाबत माहिती दिली.
या गोलमेज परिषदेत सहभागी झालेल्या मान्यवरांनी एकमताने सर्जनशील क्षेत्रातील भारताच्या मनुष्यबळासोबत परस्पर सहकार्यपूर्ण भागिदारी करण्याबद्दल, त्याअंतर्गत आपापल्या तांत्रिक क्षमतांचा उपयोग करून घेण्याबद्दल आणि आपापल्या चित्रपट परिसंस्थांना समृद्ध करू शकतील अशा माध्यमांची चाचपणी करण्याबद्दल आशावाद व्यक्त केला.
परराष्ट्र मंत्रालयाच्या संचालक (बाह्य प्रतिसाद विभाग) राजेश परिहार यांनी या गोलमेज परिषदेच्या आभार व्यक्त केले. त्यांनी या परिषदेत सहभागी झालेल्या राजकीय दूतांनी दिलेल्या योगदानाचा दखलपूर्ण उल्लेख केला, आणि परस्पर सहकार्याच्या तत्वाअंतर्गतचे जागतिक दृकश्राव्य वातावरण जपण्यासाठी भारताची वचनबद्धताही पुन्हा एकदा अधोरेखित केली. इफ्फी 2025 मधील या राजदूत गोलमेज परिषद, दृढ द्विपक्षीय संबंध, अधिक बहुआयामी पैलुयुक्त माध्यम भागीदारी आणि कथात्मक मांडणी क्षेत्राच्या भविष्यासाठीचा परस्पर सामायिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56new/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2192534
| Visitor Counter:
17