मंत्रिमंडळ
azadi ka amrit mahotsav

हरित ऊर्जेसाठी महत्त्वाच्या असलेल्या ग्रॅफाइट, सिझियम, रुबिडियम आणि झिरकोनियम खनिजांच्या रॉयल्टी दरांचे सुसूत्रीकरण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 12 NOV 2025 9:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 नोव्हेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत सिझियम, ग्रॅफाइट, रुबिडियम आणि झिरकोनियमच्या रॉयल्टी दराचे खालीलप्रमाणे तर्कसंगतीकरण करण्यास मंजुरी  दिली आहे:

खनिज रॉयल्टी दर
सीजियम उत्पादित धातूमध्ये असलेल्या सिझियम धातूवर सिझियम धातूच्या सरासरी विक्री किमतीच्या (ASP) 2%

ग्रॅफाइट

(i) ऐंशी टक्के किंवा त्याहून अधिक निश्चित  कार्बनसह

(ii) ऐंशी टक्क्यांपेक्षा कमी निश्चित  कार्बनसह 

मूल्यानुसार सरासरी विक्री मूल्याच्या 2%

मूल्यानुसार सरासरी विक्री मूल्याच्या 4%

 रुबिडियम उत्पादित धातूमध्ये असलेल्या रुबिडियम धातूवर रुबिडियम धातूच्या सरासरी विक्री मूल्याच्या 2%
झिरकोनियम उत्पादित धातूमध्ये असलेल्या झिरकोनियम धातूवर झिरकोनियम धातूच्या सरासरी विक्री मूल्याच्या 1%

 

 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वरील निर्णयामुळे सिझियम, रुबिडियम आणि झिरकोनियम असलेल्या खनिज खंडांच्या लिलावाला प्रोत्साहन  मिळेल ज्यामुळे केवळ ही खनिजेच वापरात येणार नाहीत तर त्यांच्याशी संबंधित लिथियम, टंगस्टन, आरईईएस, निओबियम इत्यादी महत्त्वाच्या खनिजे देखील उपलब्ध होतील. ग्रॅफाइटचे रॉयल्टी दर मूल्यानुसार निश्चित केल्याने विविध श्रेणींमध्ये खनिजांच्या किमतीतील बदल प्रमाणानुसार दिसून येतील.  या खनिजांच्या स्वदेशी उत्पादनात वाढ झाल्याने आयात आणि पुरवठा साखळीतील त्रुटी  कमी होतील आणि देशात रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.

ग्रॅफाइट, सिझियम, रुबिडियम आणि झिरकोनियम हे उच्च तंत्रज्ञानाच्या अनुप्रयोगांसाठी आणि ऊर्जा संक्रमणासाठी महत्त्वाची खनिजे आहेत. खाणी आणि खनिजे (विकास आणि नियमन) कायदा, 1957 (एमएमडीआर कायदा) मध्ये सूचीबद्ध केलेल्या 24 महत्त्वाच्या आणि धोरणात्मक खनिजांमध्ये ग्रेफाइट आणि झिरकोनियम देखील समाविष्ट आहेत.

ग्रॅफाइट हा इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) बॅटरीमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे, जो प्रामुख्याने एनोड मटेरियल म्हणून काम करतो, ज्यामुळे उच्च वाहकता आणि चार्ज क्षमता वाढते. मात्र , भारत ग्रॅफाइटच्या गरजेच्या 60% आयात करतो. सध्या देशात 9 ग्रॅफाइट खाणी कार्यरत आहेत आणि आणखी 27 ब्लॉक्सचा यशस्वीरित्या लिलाव झाला आहे. त्याशिवाय  जीएसआय आणि एमईसीएल ने 20 ग्रॅफाइट ब्लॉक्स हस्तांतरित केले आहेत ज्यांचा लिलाव केला जाईल आणि सुमारे 26 ब्लॉक्सचा शोध सुरु आहे.

झिरकोनियम हा एक बहुउपयोगी धातू आहे जो अणुऊर्जा, एरोस्पेस, आरोग्यसेवा आणि उत्पादन यासह विविध उद्योगांमध्ये वापरला जातो, कारण त्याचा असाधारण गंज प्रतिकार आणि उच्च तापमान स्थिरता यामुळे सिझियमचा वापर प्रामुख्याने उच्च-तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात , विशेषतः अणु घड्याळे, जीपीएस प्रणाली, इतर उच्च अचूक उपकरणे, कर्करोग उपचारांसह वैद्यकीय उपकरणे इत्यादींमध्ये केला जातो. रुबिडियमचा वापर फायबर ऑप्टिक्स, दूरसंचार प्रणाली, नाईट व्हिजन उपकरणे इत्यादींमध्ये वापरला जाणाऱ्या विशेष चष्मा बनवण्यासाठी केला जातो.

अलिकडेच, केंद्र सरकारने  महत्त्वाच्या खनिज ब्लॉक्सच्या लिलावाच्या सहाव्या टप्प्यासाठी 16सप्टेंबर  2025 रोजी एनआयटी जारी केला आहे. यामध्ये ग्रॅफाइटचे 5 ब्लॉक्स, रुबिडियमचे 2 आणि सीज़ियम आणि झिरकोनियम ब्लॉक्सचा प्रत्येकी 1 ब्लॉकचा  समावेश आहे (तपशील जोडलेला आहे). आज केंद्रीय मंत्रिमंडळाने रॉयल्टीच्या दराला दिलेल्या मंजुरीमुळे बोली लावणाऱ्यांना लिलावात त्यांच्या आर्थिक बोली तर्कसंगतपणे  सादर करण्यास मदत होईल.

1 सप्टेंबर , 2014 पासून ग्रॅफाइटचा रॉयल्टी दर रुपये प्रति टन आधारावर निर्दिष्ट करण्यात आला आहे. महत्वपूर्ण आणि धोरणात्मक खनिजांच्या यादीतील हे एकमेव खनिज आहे ज्याचा रॉयल्टी दर प्रति टन आधारावर निर्दिष्ट करण्यात आला होता. शिवाय, विविध ग्रेडमधील ग्रॅफाइटच्या किमतींमधील फरक लक्षात घेता, ग्रॅफाइटची रॉयल्टी आता यथामूल्य आधारावर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून वेगवेगळ्या ग्रेडमधील उपार्जित रॉयल्टी  खनिजाच्या किमतींमधील बदल प्रमाणानुसार प्रतिबिंबित करेल. अलिकडच्या वर्षांत, बहुतेक महत्त्वाच्या खनिजांचे रॉयल्टी दर  2% ते  4% च्या श्रेणीत निर्दिष्ट करण्यात आले आहेत.

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2189471) Visitor Counter : 15