पंतप्रधान कार्यालय
दिल्ली येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर भूतानने दर्शवलेल्या ऐक्यभावासाठी पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता
प्रविष्टि तिथि:
11 NOV 2025 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानचे चौथे राजे यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भूतानच्या जनतेने भारताप्रती ऐक्यभाव प्रदर्शित केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर, भूतानच्या जनतेने पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विशेष प्रार्थना केली. करुणा आणि एकतेच्या या मनस्वी कृतीची दखल घेत पंतप्रधान म्हणाले, “ही भावना माझ्या कायम स्मरणात राहील.”
त्यांनी X वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे:
भूतानच्या चौथ्या राजांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भूतानच्या जनतेने एका विशेष प्रार्थनेद्वारे दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर भारतातील लोकांप्रती ऐक्यभाव व्यक्त केला. ही भावना माझ्या कायम स्मरणात राहील.”
* * *
सोनाली काकडे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2188895)
आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam