पंतप्रधान कार्यालय
आयसीसी महिला विश्वचषक 2025 स्पर्धा जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय संघाचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
03 NOV 2025 6:14AM by PIB Mumbai
आयसीसी महिला विश्वचषक 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचे अभिनंदन केले आहे.
एक्स मंचावरील संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“आयसीसी महिला विश्वचषक 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा नेत्रदीपक विजय. या संघाच्या अंतिम फेरीतील कामगिरीत अद्भुत कौशल्ये आणि आत्मविश्वास दिसून आला. भारतीय संघाने या संपूर्ण स्पर्धेत विलक्षण संघभावना आणि दृढनिश्चयाचे दर्शन घडवले. आपल्या खेळाडूंचे अभिनंदन. हा ऐतिहासिक विजय भविष्यातील खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहित करेल.”
#WomensWorldCup2025”
***
JaydeviPujariSwami/SanjanaChitnis/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2185751)
आगंतुक पटल : 44
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada