पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आपल्या छत्तीसगड दौऱ्याची क्षणचित्रे केली सामायिक
Posted On:
01 NOV 2025 9:06PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या छत्तीसगड दौऱ्याची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.
X माध्यमावरील संदेशांमध्ये, पंतप्रधानांनी नया रायपूर अटल नगर इथल्या रोड शो दरम्यान जनतेने व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल आणि लोकांनी दर्शविलेल्या उत्साहाबद्दल आभार मानले आहेत. ते म्हणतात,
“छत्तीसगडमध्ये नया रायपूर अटलनगर इथे माझ्या परिवारातील लोकांनी ज्या उत्साहाने, उल्हासाने आणि सांस्कृतिक परंपरेसह माझे स्वागत केले ते भारावून टाकणारे आहे.”
नया रायपूर अटल नगर येथील छत्तीसगड विधानसभेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले, असे मोदी म्हणतात. हरित इमारत संकल्पनेवर आधारित असलेली ही नवी इमारत सौर उर्जेच्या वापरासोबतच पावसाच्या पाण्याचे पुनर्भरणही करेल. ते म्हणतात,
“छत्तीसगडच्या विकासाला आणखी गती देण्यासाठी नया रायपूर अटल नगरमध्ये बांधलेल्या विधानसभेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. हरित इमारतीच्या संकल्पनेनुसार तयार झालेली ही इमारत केवळ सौर उर्जेवर चालणारी नाही तर पावसाचे पाणी साठवून ठेवणारीही असेल.”
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरणदेखील पंतप्रधानांच्या हस्ते नया रायपूर अटल नगर इथे करण्यात आले. हा पुतळा भविष्यातील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असे ते म्हणाले. एक पेड मां के नाम या वृक्षारोपणाच्या मोहीमेतही ते सहभागी झाले. मोदी म्हणतात,
“छत्तीसगडमध्ये आज माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची सुसंधी मिळाली. नया रायपूर अटल नगरमधील हा पुतळा प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील. याचवेळी एक पेड मां के नाम अभियानात वृक्षारोपणही केले.”
नया रायपूर येथील श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयातील संवादात्मक कार्यक्रम खूप खास आणि ह्रदयस्पर्शी होता असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. जन्मजात ह्रदयरोगावर मात केलेल्या मुलांना भेटण्याची संधी मला मिळाली. त्यांचा उत्साह आणि सकारात्मकता यामुळे मला नवी उर्जा मिळाली, असे ते म्हणाले. ते लिहीतात,
“छत्तीसगडमधल्या नया रायपूर इथला संवादाचा कार्यक्रम खूप खास आणि ह्रदयस्पर्शी होता. श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयातील त्या धैर्यवान मुलांशी गप्पा मारण्याचे सौभाग्य मला मिळाले. त्यांनी जन्मजात ह्रदयरोगावर मात केली आहे. त्यांच्या उत्साही आणि आशादायी बोलण्याने मला एक नवी उर्जा मिळाली.”
नवीन विधानसभा इमारतीच्या उद्घाटन समारंभात लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या आनंदामुळे छत्तीसगड राज्याच्या 25 व्या स्थापना दिन सोहोळ्यात उत्सवी वातावरण तयार झाले. मोदी म्हणतात,
“छत्तीसगडच्या नव्या विधानसभेच्या उद्घाटन समारंभात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या माझ्या परिवारातील लोकांच्या आनंदामुळे राज्याच्या 25 व्या स्थापना दिनाची रंगत आणखी वाढली.”
नया रायपूर अटल नगर येथील ब्रम्हकुमारी ध्यानधारणा केंद्र असलेल्या ‘शांती शिखर’ इमारतीचे उद्घाटन केल्याचे पंतप्रधानांनी पुढे नमूद केले. या इमारतीची भव्यता, आधुनिकता आणि आध्यात्मिकता दोन्हींचा संगम आहे असे म्हणून शांती शिखर ध्यानधारणा, आत्मज्ञान आणि जागतिक शांतता यांचे प्रमुख केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदी म्हणतात,
“नया रायपूर अटल नगरमध्ये ब्रम्हकुमारी ध्यानधारणा केंद्र असलेल्या शांती शिखर केंद्राचा शुभारंभ करण्याचे भाग्य मला लाभले. या केंद्राची भव्यता त्याच्या आधुनिक तरीही आध्यात्मिक स्वरुपातून दिसून येते. या आध्यात्मिक आंदोलनाचे वटवृक्षात रुपांतर होताना मी पाहिले आहे. ही दिव्य संस्था साधना, आत्मज्ञान आणि विश्व शांतीचे एक प्रमुख केंद्र बनेल असा मला विश्वास आहे.”
***
माधुरी पांगे/सुरेखा जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2185388)
Visitor Counter : 8
Read this release in:
Telugu
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada