पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

संवत्सरीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जीवनातील सुसंवाद आणि क्षमाशीलतेचे महत्त्व केले अधोरेखित

Posted On: 07 SEP 2024 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 सप्‍टेंबर 2024

 

संवत्सरीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर एक हृदयस्पर्शी संदेश सामायिक केला, ज्यामध्ये आपल्या जीवनातील सुसंवाद आणि क्षमाशीलता यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांनी नागरिकांना सहानुभूती आणि ऐक्य स्वीकारण्याचे आवाहन केले, दया आणि एकजुटीची भावना जोपासण्याचे आवाहन केले ज्यामुळे आपल्या सामूहिक प्रवासाला मार्गदर्शन लाभू शकते.

आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "सौहार्द आणि इतरांना क्षमा करण्याची ताकद संवत्सरी अधोरेखित करते. ती सहानुभूती आणि ऐक्य यांना आपल्या प्रेरणेचा स्रोत म्हणून स्वीकारण्याचे आवाहन करते. या भावनेने आपण एकजुटीचे बंध पुन्हा निर्माण करून ते दृढ करूया. दयाळूपणा आणि एकता यांच्या सहाय्याने आपल्या पुढील प्रवासाला आकार देऊया. मिच्छामी दुक्कडम.”

 

* * *

नेहा कुलकर्णी/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2185022) अभ्यागत कक्ष : 15