भारतीय निवडणूक आयोग
निवडणुकीशी संबंधित सर्व शंका/तक्रारींच्या निराकरणासाठी "1950" हेल्पलाइन क्रमांकासह देशभरामध्ये जिल्हास्तरावर मतदारांच्या मदतीसाठी ‘बुक-अ-कॉल विथ बीएलओ’ सुविधा
Posted On:
29 OCT 2025 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2025
- नागरिकांच्या सर्व शंका/तक्रारींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार हेल्पलाइन आणि सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी जिल्हास्तरीय ‘हेल्पलाइन’ सक्रिय केल्या आहेत.
- राष्ट्रीय संपर्क केंद्र (एनसीसी) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्रीय हेल्पलाइन म्हणून सेवा देईल. दररोज सकाळी 8:00 ते रात्री 8:00 पर्यंत 1800-11-1950 या टोल-फ्री क्रमांकाच्या माध्यमातून ती उपलब्ध असेल. नागरिकांना आणि इतर भागधारकांना निवडणूक सेवा आणि प्रश्नांमध्ये सहाय्य करणाऱ्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांद्वारे दूरध्वनीला उत्तर दिले जाईल.
- वेळेवर आणि स्थानिक पातळीवर प्रतिसाद मिळावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्याला अनुक्रमे स्वतःचे राज्य संपर्क केंद्र (एससीसी) आणि जिल्हा संपर्क केंद्र (डीसीसी) स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही केंद्रे वर्षभर सर्व कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत कार्यरत राहून राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या प्रादेशिक भाषांमध्ये मदत पुरवतात.
- सर्व तक्रारी आणि शंका राष्ट्रीय तक्रार सेवा पोर्टल (NGSP 2.0) द्वारे नोंदवल्या जातात आणि त्यांचा मागोवा घेतला जातो.
- याव्यतिरिक्त केंद्रीय निवडणूक आयोगाने 'बुक-अ-कॉल विथ बीएलओ' सुविधा सुरू केली असून याद्वारे ‘ईसीआयनेट- प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्याद्वारे, नागरिक आपापल्या बूथस्तरीय अधिकाऱ्याशी थेट संपर्क साधू शकतात.
- नागरिक ईसीआयनेट अॅप वापरून निवडणूक अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधू शकतात. केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ), जिल्हा निवडणूक अधिकारी (डीईओ), मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांना नियमितपणे प्रगतीचे निरीक्षण करण्याचे आणि वापरकर्त्यांच्या विनंतीचे 48 तासांच्या आत निवारण करण्याचे निर्देश दिले आहेत.
- निवडणुकीशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विद्यमान यंत्रणेव्यतिरिक्त या सुविधा आहेत. नागरिक complaints@eci.gov.in वर ईमेल देखील पाठवू शकतात.
- निवडणूक आयोग सर्व मतदारांना त्यांच्या समस्यांचे त्वरित आणि पारदर्शक निराकरण करण्यासाठी निवडणुकीशी संबंधित सर्व माहिती, अभिप्राय, सूचना आणि तक्रारींसाठी 'बुक-अ-कॉल विथ बीएलओ' आणि समर्पित मतदार हेल्पलाइन क्रमांक - 1950 सुविधांचा वापर करण्यास प्रोत्साहित करत आहे.
* * *
सुवर्णा बेडेकर/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183905)
Visitor Counter : 14