पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची कुवेतच्या महामहिम अमीर यांचे प्रमुख पाहुणे म्हणून अरेबियन गल्फ कपला उपस्थिती
प्रविष्टि तिथि:
21 DEC 2024 10:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2024
कुवेतचे अमीर, महामहिम शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, कुवेतमध्ये 26व्या अरेबियन गल्फ कपच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पंतप्रधान मोदी, कुवेतचे महामहिम अमीर, महामहिम राजपुत्र आणि कुवेतच्या पंतप्रधानांसह भव्य उद्घाटन समारंभाचे साक्षीदार होते. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी कुवेतच्या नेत्यांशी अनौपचारिक चर्चा देखील केली.
कुवेत द्वैवार्षिक अरेबियन गल्फ कपचे आयोजन करत आहे, ज्यामध्ये जीसीसी देश, इराक आणि येमेनसह आठ देश सहभागी झाले आहेत. ही फुटबॉल स्पर्धा या प्रदेशातील सर्वात प्रमुख क्रीडा स्पर्धांपैकी एक आहे. सहभागी देशांपैकी, कुवेतने सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. पंतप्रधान मोदींनी सर्व सहभागी देशांना शुभेच्छा दिल्या आहेत.
* * *
जयदेवी पुजारी-स्वामी/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2183151)
आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam