पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली येथे करणार पहिल्या बोडोलँड महोत्सोवाचे उद्घाटन
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आणि चैतन्यपूर्ण बोडो समाज निर्माण करण्यासाठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या विषयावर एक भव्य कार्यक्रम
2020 मध्ये पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ‘बोडो शांतता करारा’नंतरच्या पुनर्बांधणी आणि सहनशक्तीच्या प्रवासाचा महोत्सव साजरा केला जाणार
प्रविष्टि तिथि:
14 NOV 2024 4:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता नवी दिल्लीतील एसएआय इंदिरा गांधी क्रीडा संकुलात पहिल्या बोडोलँड महोत्सोवाचे उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.
15 आणि 16 नोव्हेंबर रोजी दोन दिवसांचा हा महोत्सव आयोजित केला जात आहे. शांतता टिकवून ठेवण्यासाठी आणि चैतन्यपूर्ण बोडो समाज निर्माण करण्यासाठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या विषयावर हा एक भव्य कार्यक्रम आहे. या महोत्सवाचा उद्देश केवळ बोडोलँडमध्येच नव्हे तर आसाम, पश्चिम बंगाल, नेपाळ आणि ईशान्येकडील इतर आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात राहणाऱ्या स्थानिक बोडो समुदायाला एकत्र आणणे, हा आहे. महोत्सोवाची मुख्य संकल्पना 'समृद्ध भारतासाठी शांतता आणि सौहार्द' अशी आहे, ज्यात बोडोलँड प्रादेशिक क्षेत्रातील (BTR) इतर समुदायांसह बोडो समुदायाच्या समृद्ध संस्कृती, भाषा आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे. बोडोलँडच्या सांस्कृतिक आणि भाषिक वारसा, पर्यावरणीय जैवविविधता आणि पर्यटन क्षमतेचा उपयोग करून विकास साधणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे.
विशेष म्हणजे, 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान नेतृत्वाखाली बोडो शांतता करारावर स्वाक्षरी झाल्यापासून पुनर्बांधणी आणि सहनशक्तीच्या उल्लेखनीय प्रवासाचा देखील हा उत्सव आहे. या शांतता कराराने केवळ बोडोलँडमधील दशकांपासून सुरू असलेला संघर्ष, हिंसाचार आणि जीवितहानी संपवली नाही तर इतर शांतता करारांसाठी उत्प्रेरक म्हणूनही काम केले आहे.
"भारतीय वारसा आणि परंपरांमध्ये योगदान देणारी समृद्ध बोडो संस्कृती, परंपरा आणि साहित्य" या विषयावरील सत्र हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असेल आणि त्यात बोडो समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, भाषा आणि साहित्यासंबंधी विविध विषयांवर चर्चा होईल. "राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020 अंतर्गत मातृभाषा माध्यमातून शिक्षणातील आव्हाने आणि संधी" या विषयावर आणखी एक सत्र आयोजित केले जाईल. याशिवाय, बोडोलँड प्रदेशातील पर्यटन आणि संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने "स्थानिक सांस्कृतिक मेळावा तसेच संस्कृती आणि पर्यटनाद्वारे 'सशक्त बोडोलँड' प्रदेश निर्माण’ या विषयावर एक थिमॅटिक चर्चा आयोजित केली जाईल, ज्याचा उद्देश बुडलांड प्रदेशातील पर्यटन हे संस्कृतीला प्रोत्साहन देणे असेल.
या महोत्सवात बोडोलँड प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश, भारताच्या इतर भागांसह नेपाळ आणि भूतान या शेजारील राज्यांमधून पाच हजारांहून अधिक सांस्कृतिक, भाषिक आणि कलाप्रेमी उपस्थित राहतील.
* * *
आशिष सांगळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2183046)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam