गृह मंत्रालय
छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात 21 माओवाद्यांनी शस्त्रांसह आत्मसमर्पण केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आनंद
आत्मसमर्पण केलेल्या 21 माओवाद्यांपैकी 13 वरिष्ठ कार्यकर्ते/बऱ्याच काळापासून माओवादी कारवायांमध्ये सक्रिय
मोदी सरकारच्या आवाहनावर हिंसाचाराचा त्याग करून मुख्य प्रवाहात सामील झाल्याबद्दल त्यांचे कौतुक – अमित शाह
अजूनही बंदुका हाती असलेल्या इतरांना मी लवकरात लवकर आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करतो
31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचे उच्चाटन करण्याचा आमचा संकल्प आहे
Posted On:
27 OCT 2025 3:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2025
छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात 21 माओवाद्यांनी त्यांच्या शस्त्रांसह आत्मसमर्पण केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आनंद व्यक्त केला.
एक्स या समाजमध्यमावरील एका पोस्टमध्ये, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, “छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात 21 माओवाद्यांनी त्यांच्या शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे हे सांगताना आनंद होत आहे.
त्यापैकी 13 वरिष्ठ कार्यकर्ते होते. मोदी सरकारच्या आवाहनानुसार हिंसाचाराचा त्याग करून मुख्य प्रवाहात सामील झाल्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.अजूनही बंदुका हाती असलेल्या इतरांना लवकरात लवकर आत्मसमर्पण करण्याचे आवाहन मी पुन्हा करतो. 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचे उच्चाटन करण्याचा आमचा संकल्प आहे.”
नेहा कुलकर्णी/हेमांगी कुलकर्णी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2182916)
Visitor Counter : 15
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam