पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतीश शाह यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक

प्रविष्टि तिथि: 25 OCT 2025 7:44PM by PIB Mumbai

 

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला. सतीश शाह हे भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व होते असे त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात ​X या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी सामायिक केलेला संदेश :

सतीश शाह यांच्या निधनाने व्यथित झालो. भारतीय मनोरंजन क्षेत्रातील एक सच्चे दिग्गज म्हणून कायमच त्यांचे स्मरण केले जाईल. त्यांच्या सहज विनोदी आणि गाजलेल्या भूमिकांनी असंख्य लोकांच्या आयुष्यात हास्य आणले. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना. ॐ शांती.

***

माधुरी पांगे / तुषार पवार / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2182520) आगंतुक पटल : 39
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam