पंतप्रधान कार्यालय
इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
24 OCT 2025 7:49PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाच्या (आयटीबीपी) स्थापना दिनानिमित्त सर्व हिमवीरांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या. या दलाने राष्ट्रासाठी दिलेल्या उत्कृष्ट सेवेचाही त्यांनी गौरव केला असून, या दलाचे शौर्य, शिस्तबद्धता आणि कर्तव्याप्रती असलेल्या दृढ बांधिलकीचे त्यांनी कौतुक केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत आणि बचाव मोहिमांदरम्यानची या दलाची करुणा वृत्ती आणि तत्परतेचीही पंतप्रधानांनी प्रशंसा केली असून, यात या दलाच्या सेवा आणि मानवतेच्या उत्कृष्ट परंपरांचे प्रतिबिंब उमटल्याचे दिसते असे त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाजमाध्यमावर सामायिक केलेला संदेश :
भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे सर्व हिमवीर आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या या दलाच्या स्थापना दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. हे दल अतुलनीय शौर्य, शिस्तबद्धता आणि कर्तव्यनिष्ठेचे मूर्तिमंत रूप आहे. अत्यंत प्रतिकूल हवामानात तसेच आव्हानात्मक भूप्रदेशात सेवा बजावताना, ते दृढ निर्धाराने राष्ट्राचे संरक्षण करतात. आपत्कालीन मदत आणि बचाव मोहिमांदरम्यानची त्यांची करुणा वृत्ती आणि तत्परतेतून, सेवा आणि मानवतेच्या उत्कृष्ट परंपरांचे प्रतिबिंब उमटते.
****
निलिमा चितळे / तुषार पवार / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2182351)
Visitor Counter : 11
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada