पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी सामायिक केले एनडीटीव्ही वर्ल्ड समिट 2025 मधील त्यांच्या भाषणाचे काही अंश

Posted On: 18 OCT 2025 12:19PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत एनडीटीव्ही वर्ल्ड समिट 2025 मध्ये केलेल्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे सामायिक केले आहेत. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी मान्यवरांचे स्वागत केले.

सर्व नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मोदी यांनी नमूद केले की सध्याच्या उत्सवी वातावरणामध्ये एनडीटीव्ही वर्ल्ड समिटचे आयोजन होत आहे. या कार्यक्रमाच्या ‘अनस्टॉपेबल इंडिया’ या संकल्पनेची त्यांनी प्रशंसा केली आणि सध्या भारत अजिबात थांबण्याच्या मनःस्थितीत नसल्याने ही संकल्पना अतिशय समर्पक असल्याची टिप्पणी केली. भारत थांबणार नाही किंवा विश्रांती घेणार नाही, 140 कोटी भारतीय अतिशय झपाट्याने एकजुटीने पुढे जात आहेत, असा निर्धार पंतप्रधानांनी व्यक्त केला.

यासंदर्भात एक्स पोस्टच्या एका  मालिकेत मोदी म्हणालेः

"गेल्या 11 वर्षात भारताने प्रत्येक शंकाकुशंका फेटाळून लावली आहे आणि प्रत्येक आव्हानाचा पाडाव केला आहे. यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होणाऱ्या भारताचा आत्मविश्वास दिसून येत आहे."

"आज याच कारणामुळे संपूर्ण जग भारताला एक विश्वसनीय, जबाबदार आणि टिकाऊ भागीदार म्हणून पाहत आहे... "

"प्रत्येक अंदाजापेक्षा अधिक चांगली कामगिरी करणे हा देशाचा स्थायी भाव बनला आहे म्हणूनच भारत अनस्टॉपेबल आहे."

"काँग्रेसने आपल्या अनेक दशकांच्या राजवटीत नेहमीच धोरण आणि प्रक्रियांचे सरकारीकरण करण्यावर भर दिला, तर गेल्या 11 वर्षात आम्ही सातत्याने लोकशाहीकरणावर भर दिला आहे. बँकिंग सहित अनेक क्षेत्रांची बळकटी हा त्याचाच परिणाम आहे."

"BSNL च्या 'मेड इन इंडिया 4G स्टॅक' चे लॉन्चिंग असो किंवा हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीवर आधारित 'ई-संजीवनी' सेवा असो, यावरून हे दिसून येते की गरीब आणि वंचितांचे जीवन सुधारण्यासाठी आम्ही किती संवेदनशीलतेने काम करत आहोत."

"आमचा भर देशवासियांचे जीवन सुकर करण्यासोबतच त्यांची बचत वाढवण्यावरही आहे. इन्कम टॅक्स आणि जीएसटी मध्ये केलेली मोठी कपात याचाच प्रत्यक्ष दाखला आहे."

"मी त्या मातांचे दुःख जाणतो, ज्यांनी माओवादी दहशतीमध्ये आपली मुले गमावली आहेत. यापैकी बहुतेक गरीब आणि आदिवासी कुटुंबातील होते. मला खात्री आहे की त्या मातांच्या आशीर्वादाने लवकरच देश माओवादी  दहशतीतून पूर्णपणे मुक्त होईल."

***

हर्षल अकुडे / शैलैश पाटील / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2180673) Visitor Counter : 9