पंतप्रधान कार्यालय
श्रीलंकेच्या पंतप्रधान डॉ. हरिनी अमरसूर्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
यंदाच्या एप्रिलमधील श्रीलंकेचा दौरा आणि राष्ट्राध्यक्ष दिसानायका यांच्याबरोबरच्या फलदायी चर्चेला पंतप्रधान मोदी यांनी दिला उजाळा
शिक्षण, तंत्रज्ञान, नवोन्मेष, विकास सहकार्य आणि मच्छिमारांचे कल्याण यामधील सहकार्य मजबूत करण्याच्या उपाययोजनांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
दोन्ही देशांच्या सामायिक विकास प्रवासात एकत्र काम करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पंतप्रधान मोदी यांनी केला पुनरुच्चार
पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष दिसनायका यांना शुभेच्छा दिल्या आणि हे संबंध कायम ठेवण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे सांगितले
प्रविष्टि तिथि:
17 OCT 2025 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2025
श्रीलंकेच्या पंतप्रधान डॉ.हरिनी अमरसूर्या यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी त्यांचे स्नेहमय स्वागत केले, आणि ते म्हणाले की, त्यांच्या भेटीमुळे भारत-श्रीलंका यांच्यातील ऐतिहासिक आणि बहुआयामी संबंधांना नवी गती मिळेल.
पंतप्रधानांनी यंदाच्या एप्रिलमध्ये श्रीलंकेला दिलेल्या आपल्या राजकीय भेटीचे स्मरण केले. या भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायका यांच्याशी सहकार्याच्या सर्व क्षेत्रांवर केलेल्या फलदायी चर्चेचा त्यांनी उल्लेख केला.
दोन्ही नेत्यांनी शिक्षण, तंत्रज्ञान, नवोन्मेष विकास सहकार्य आणि आपल्या मच्छिमारांचे कल्याण, यासह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा केली.
भारत आणि श्रीलंकेमधील विशेष संबंधांवर प्रकाश टाकत, पंतप्रधानांनी दोन्ही देशांच्या सामायिक विकास प्रवासात एकत्र काम करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष दिसानायका यांना शुभेच्छा दिल्या आणि हे संबंध कायम ठेवण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे सांगितले.
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2180530)
आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam