पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टणम येथे गुगल एआय हबच्या उद्घाटनाचे केले स्वागत
Posted On:
14 OCT 2025 4:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील गतिशील शहर विशाखापट्टणम येथे गुगल एआय हबच्या उद्घाटनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
गिगावॅट-स्तरावरील डेटा सेंटर पायाभूत सुविधा समाविष्ट असलेली ही बहुआयामी गुंतवणूक "विकसित भारत" या आपल्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
"ही गुंतवणूक तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरेल. ही योजना सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सुनिश्चित करेल, नागरिकांना अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देईल, भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देईल आणि भारताला जागतिक तंत्रज्ञान अग्रणी बनवेल," असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे :
"विशाखापट्टणम या गतिशील शहरात गुगल एआय हबच्या उद्घाटनामुळे अत्यंत आनंदित आहे.
गिगावॅट-स्तरावरील डेटा सेंटर पायाभूत सुविधा समाविष्ट असलेली ही बहुआयामी गुंतवणूक 'विकसित भारत' या आपल्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.
हे तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरेल. तसेच, सर्वांसाठी (AI for All) कृत्रिम बुद्धिमत्ता सुनिश्चित करेल, नागरिकांना अत्याधुनिक साधने उपलब्ध करून देईल, भारताची डिजिटल अर्थव्यवस्था बळकट करेल आणि भारताला जागतिक तंत्रज्ञान अग्रणी म्हणून सुनिश्चित करेल."
@sundarpichai
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
(Release ID: 2178926)
Visitor Counter : 16