पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेअंतर्गत झालेल्या प्रगतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे केले अभिनंदन
Posted On:
09 OCT 2025 10:17PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेअंतर्गत झालेल्या प्रगतीबद्दल नेतन्याहू यांचे अभिनंदन केले.
पंतप्रधान मोदी यांनी ओलिसांच्या सुटकेबाबतच्या कराराचे आणि गाझामधील लोकांना मानवतावादी मदत वाढविण्याबाबतच्या कराराचे स्वागत केले. दहशतवादाचा जगात कुठेही कोणत्याही स्वरूपात किंवा प्रकटीकरणात स्वीकार केला जाणार नाही, याचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला.
पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे;
“राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेअंतर्गत झालेल्या प्रगतीबद्दल अभिनंदन करण्यासाठी माझे मित्र, पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. ओलिसांच्या सुटकेबाबतच्या कराराचे आणि गाझामधील लोकांना मानवतावादी मदत वाढविण्याबाबत झालेल्या कराराचे स्वागत करतो. दहशतवादाचा जगात कुठेही कोणत्याही स्वरूपात किंवा प्रकटीकरणात स्वीकार केला जाणार नाही.@netanyahu”
***
सुवर्णा बेडेकर / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2177197)
अभ्यागत कक्ष : 22
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam