पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रनिर्माणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अमूल्य योगदान अधोरेखित करत, परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रेरणादायी भाषण पंतप्रधानांकडून सामाईक
Posted On:
02 OCT 2025 1:15PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रसेवेला समर्पित शंभर वर्षांच्या कार्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस)कौतुक केले. परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रेरणादायी भाषणाचा संदर्भ देताना, पंतप्रधानांनी संघाची राष्ट्र उभारणीतील महत्त्वाची भूमिका आणि भारतीय संस्कृतीविषयक मूल्य वृद्धिंगत करण्याप्रति असलेली अढळ वचनबद्धता अधोरेखित केली.
एक्स या समाजमाध्यमांवरील आरएसएसच्या संदेशावर प्रतिक्रिया देताना, पंतप्रधान मोदी लिहितात,
"परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणामध्ये राष्ट्रनिर्माणातील संघाच्या समृद्ध योगदानावर प्रकाश टाकला आणि आपल्या मातृभूमीच्या अंतर्निहीत सामर्थ्याचा उल्लेख केला, ज्यामुळे देश नवीन शिखरे गाठेल आणि त्याचा संपूर्ण जगाला फायदा होईल. "
#RSS100Years”
***
शैलेश पाटील / विजयालक्ष्मी साळवी साने / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2174157)
Visitor Counter : 6
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam