पंतप्रधान कार्यालय
दिल्ली येथे होत असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे पंतप्रधानांकडून स्वागत
Posted On:
27 SEP 2025 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2025
नवी दिल्ली येथे आजपासून सुरू होत असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडू आणि प्रतिनिधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे की,
जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे यजमानपद मिळाल्याचा भारताला अभिमान आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा. ही स्पर्धा मानवी जिद्द आणि निर्धार यांचा उत्सव आहे. या स्पर्धेमुळे जगभरात अधिक समावेशक, प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायक क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळो.
* * *
निलिमा चितळे/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2172270)
Visitor Counter : 7