पंतप्रधान कार्यालय
मेक इन इंडिया उपक्रमाच्या 11 वर्षपूर्तीप्रसंगी पंतप्रधानांचे अभिवादन
Posted On:
25 SEP 2025 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मेक इन इंडिया उपक्रमाच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त, भारताच्या आर्थिक प्रवासावर आणि उद्योजकीय परिसंस्थेवर झालेल्या परिवर्तनात्मक परिणामाचा गौरव केला. पंतप्रधानांनी नमूद केले की, मेक इन इंडियाने भारतातील उद्योजकांना प्रचंड बळ दिले असून, त्यातून जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण झाला आहे.
मायगव्ह इंडिया यांनी एक्स वर केलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले :
“11 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी मेक इन इंडिया उपक्रम सुरू करण्यात आला होता. यामागे भारताच्या विकास प्रवासाला गती देणे आणि आपल्या देशातील उद्योजकीय क्षमतेला चालना देणे हे ध्येय होते.
#11YearsOfMakeInIndia ने आर्थिक सामर्थ्य अधिक बळकट करण्यास आणि आत्मनिर्भरतेच्या पायाभरणीला बळकटी देण्यास हातभार लावला आहे. यामुळे विविध क्षेत्रांमध्ये नवनवीन नवोन्मेष आणि रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन मिळाले आहे.”
“मेक इन इंडिया ने भारतातील उद्योजकांना नवचैतन्य दिले असून, त्यातून जागतिक स्तरावर परिणाम घडवून आणला आहे.”
* * *
नेहा कुलकर्णी/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2171380)
Visitor Counter : 14
Read this release in:
Bengali-TR
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam