पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मनोरंजन, सर्जनशीलता आणि संस्कृतीच्या विश्वाला एकत्र आणणारी वेव्हज जागतिक शिखर परिषदेच्या सल्लागार मंडळाची एक विस्तृत बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झाली

Posted On: 07 FEB 2025 11:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वेव्हजच्या सल्लागार मंडळाची एक विस्तृत बैठक घेतली. वेव्हज ही एक जागतिक शिखर परिषद आहे जी मनोरंजन, सर्जनशीलता आणि संस्कृतीच्या विश्वाला एकत्र आणते.

एक्स मंचावर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे:

“मनोरंजन, सर्जनशीलता आणि संस्कृतीच्या विश्वाला एकत्र आणणारी वेव्हज जागतिक शिखर परिषदेच्या सल्लागार मंडळाची एक विस्तृत बैठक नुकतीच संपली. सल्लागार मंडळाचे सदस्य विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यांनी त्यांच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला असून भारताला जागतिक मनोरंजन केंद्र बनवण्याच्या आपल्या प्रयत्नांना आणखी कसे पुढे नेता येईल याबद्दल मौल्यवान सूचना देखील त्यांनी सामायिक केल्या.”

 

* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2170656) Visitor Counter : 8