पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

​सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या परिणामकारकतेतील सुधारणा आणि अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यात प्रमुख योजनांचा असलेला प्रभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला अधोरेखित

Posted On: 24 SEP 2025 3:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2025

 

​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या आरोग्य क्षेत्रात होत असलेले परिवर्तन हे राष्ट्रीय विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे अधोरेखित केले. प्रसिद्ध हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. देवी प्रसाद शेट्टी यांनी अलीकडेच लिहिलेल्या लेखातून, आयुष्मान भारत, पोषण अभियान आणि स्वच्छ भारत यांसारख्या योजनांमुळे सार्वजनिक आरोग्यात सुधारणा होण्यासोबतच, अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळत असल्याचे अधोरेखित केले आहे.

​या संदर्भात, पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :

डॉ. देवी प्रसाद शेट्टी यांनी लिहिले आहे की, भारतातील आरोग्यसेवा आता आर्थिक प्रगतीला चालना देणारा एक महत्त्वाचे घटक बनला आहे. आयुष्मान भारत, पोषण अभियान आणि स्वच्छ भारत यांसारख्या योजनांमुळे रोगराई कमी होत आहे, कुटुंबांची बचत सुरक्षित राहत आहे आणि मानवी भांडवल निर्माण होत आहे. आरोग्याकडे खर्च म्हणून न पाहता, गुंतवणूक म्हणून पाहिल्यामुळे सुशासन आणि समृद्धी वाढू लागली आहे.

 

* * *

निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2170642) Visitor Counter : 6