पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ग्रीसच्या पंतप्रधानांनी दूरध्वनीवरून साधला संवाद
पंतप्रधान मित्सोताकिस यांनी पंतप्रधान मोदी यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
दोन्ही नेत्यांनी भारत-ग्रीस धोरणात्मक भागीदारी आणि प्रादेशिक शांतता आणि समृद्धीसाठीच्या भागीदारीला आणखी बळकटी देण्याच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार
भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराला लवकरात लवकर अंतिम रुप देण्यासाठी पंतप्रधान मित्सोताकिस यांनी दिला पाठिंबा
प्रविष्टि तिथि:
19 SEP 2025 4:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ग्रीसचे पंतप्रधान महामहीम किरियाकोस मित्सोताकिस यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला.
यावेळी पंतप्रधान मित्सोताकिस यांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या 17 सप्टेंबरला झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार मानले.
दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, जहाजबांधणी, संरक्षण, सुरक्षा, संपर्कव्यवस्था आणि दोन्ही देशांमधील जनतेचे परस्परसंबंध यांसारख्या क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंधांमधील घडामोडींचे स्वागत केले आणि भारत-ग्रीस धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.
पंतप्रधान मित्सोताकिस यांनी परस्परांना फायदेशीर असलेल्या भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराच्या प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी आणि 2026 मध्ये भारतामध्ये आयोजित होणाऱ्या एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या यशासाठी ग्रीसचा पाठिंबा व्यक्त केला.
त्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारविनिमय केला.
दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या संपर्कात राहण्याबाबत सहमती व्यक्त केली.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2168529)
आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam