पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
पंतप्रधानांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्या मैत्रीबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा पंतप्रधानांनी केला व्यक्त
प्रविष्टि तिथि:
16 SEP 2025 11:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2025
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांसाठी पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले आणि त्यांच्या मैत्रीबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.
या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेलाही पुन्हा एकदा दुजोरा दिला.
त्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही विचारांची देवाणघेवाण केली. युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या संपर्कात राहण्यावरही सहमत व्यक्त केली.
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2168442)
आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam