पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 अभियानावर आधारित लेख पंतप्रधानांनी सामायिक केला

प्रविष्टि तिथि: 19 SEP 2025 11:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2025

 

सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 अभियान कशा प्रकारे लहान बालके, किशोरवयीन मुली आणि गर्भवती महिला यांचे पोषण सुधारण्यासाठी हाती घेतलेला महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे याची माहिती देणारा, केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लिहिलेला लेख आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे.

केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी एक्स मंचावर लिहिलेल्या लेखाला प्रतिसाद देत पंतप्रधान मोदी लिहितात:

“सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 अभियान हा लहान बालके, किशोरवयीन मुली आणि गर्भवती महिला यांचे पोषण सुधारण्यासाठी हाती घेतलेला महत्त्वाचा उपक्रम आहे. देशभर विस्तारलेल्या अंगणवाडी केंद्रांच्या विशाल  जाळ्याच्या माध्यमातून या अभियानाच्या मदतीने कोट्यवधी लाभार्थ्यांना सहाय्य करण्यात येत आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाची ही योजना कशा प्रकारे आपल्या कोट्यवधी मुलांचे भविष्य घडवत आहे याचे केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवीजींनी त्यांच्या लेखात तपशीलवार वर्णन केले आहे.”

 

* * *

सुषमा काणे/संजना चिटणी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2168429) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , Telugu , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam