पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ यावर आधारित लेख केला सामायिक
Posted On:
16 SEP 2025 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2025
‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ ही संकल्पना दैनंदिन वास्तवात दिसून येत आहे – वीजपुरवठा ही चैनीची बाब राहिली नाही, लाभांचे वितरण थेट होत आहे आणि पायाभूत सुविधांचे नियोजन डिजिटल समन्वयासह होत आहे हे दर्शवणारा, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी लिहिलेला लेख आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे.
केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले:
“केंद्रीय मंत्री @mansukhmandviya यांनी या लेखात ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ ही संकल्पना दैनंदिन वास्तवात दिसून येत आहे – वीजपुरवठा ही चैनीची बाब राहिली नाही, लाभांचे वितरण थेट होत आहे आणि पायाभूत सुविधांचे नियोजन डिजिटल समन्वयासह होत आहे याविषयी लिहिले आहे.
या भारतीय संकल्पनेची आधी गुजरातमध्ये चाचणी घेण्यात आली आणि नंतर पंतप्रधान @narendramodi यांनी ती राष्ट्रीय पातळीवर राबवली असून या संकल्पनेने सरकारच्या कार्याला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले आणि भारताच्या यंत्रणेचे आश्वासक ते वितरक असे परिवर्तन घडवून 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचा मार्ग घडवला.”
शैलेश पाटील/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2167254)
Visitor Counter : 2
Read this release in:
Bengali
,
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam