पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कर्नाटकातील हसन येथील अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त


पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून सानुग्रह अनुदान केले जाहीर

Posted On: 13 SEP 2025 8:36AM by PIB Mumbai

 

कर्नाटकातील हसन येथील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले.

समाज माध्‍यम  एक्स’  वरील पोस्टमध्ये पंतप्रधानांनी  म्हटले आहे:

"कर्नाटकातील हसन येथे झालेली दुर्घटना हृदयद्रावक आहे. या दुःखद प्रसंगी, माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी झालेले प्रवासी लवकरात लवकर बरे होतील अशी मी आशा करतो. मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये सानुग्रह अनुदान दिले जाईल : पंतप्रधान @narendramodi”."

The mishap in Hassan, Karnataka, is heart-rending. In this tragic hour, my thoughts are with the bereaved families. I hope those who have been injured recover at the earliest.

An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured…

— PMO India (@PMOIndia) September 13, 2025

***

सुवर्णा बेडेकर / हेमांगी कुलकर्णी / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2166201) Visitor Counter : 2