पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

देशाचा ईशान्य भाग कशा प्रकारे आघाडी घेऊ लागला आहे याविषयीचा एक लेख पंतप्रधानांनी केला सामाईक

प्रविष्टि तिथि: 12 SEP 2025 5:16PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2025

देशाचा ईशान्य भाग विकासात कशा प्रकारे आघाडी घेऊ लागला आहे याविषयी माहिती देणारा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामाईक केला आहे. मिझोरामला राष्ट्रीय जाळ्यासोबत जोडणाऱ्या बैराबी- सैरांग रेल्वे मार्गाचे उद्घाटन कशा प्रकारे एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे ज्यामुळे या भागातील व्यापार, संपर्कव्यवस्था आणि संधींची दालने खुली होत आहेत याविषयी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लिहिलेल्या लेखाकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले आहे.  

पीएमओ इंडिया हँडलने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहेः

"देशाचा ईशान्य प्रदेश आता विकासाची प्रतीक्षा करणारा सीमावर्ती भाग राहिलेला नाही तर भारताच्या विकासगाथेचा केंद्रबिंदू बनला आहे. बैराबी- सैरांग रेल्वे मार्ग हा एक ऐतिहासिक टप्पा आहे, जो मिझोरामला राष्ट्रीय जाळ्यासोबत जोडत आहे, या भागातील व्यापार, संपर्कव्यवस्था आणि संधींची दालने खुली करत आहे.  

देशाचा ईशान्य भाग विकासात कशा प्रकारे आघाडी घेऊ लागला आहे याविषयीची माहिती देणारा केंद्रीय मंत्री @AshwiniVaishnaw यांचा हा  लेख जरुर वाचा !”


सुषमा काणे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2166056) आगंतुक पटल : 29
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam