पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जीवनमानातील सुलभता वाढवण्यात आणि विकसित भारताची उभारणी करण्यात नेक्स्टजेन जीएसटी सुधारणांच्या योगदानाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 04 SEP 2025 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 सप्‍टेंबर 2025

 

भारताची वित्तीय बांधणी  आणि जागतिक स्थान यांना नवा आकार देणाऱ्या धाडसी आर्थिक सुधारणा करण्याप्रती केंद्र सरकारची दशकभराची कटिबद्धता आज पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केली.गुंतवणुकीला अधिक चालना देणाऱ्या कॉर्पोरेट कर कपातीपासून, राष्ट्रीय बाजारपेठेचे एकीकरण करणाऱ्या जीएसटी अंमलबजावणीपर्यंत तसेच जीवनमानातील सुलभता वाढवणाऱ्या वैयक्तिक आयकर सुधारणांपर्यंत, सुधारणांची ही उड्डाणे सातत्यपूर्ण आणि नागरिक-केंद्री राहिली आहेत.

कररचनेचे सुलभीकरण करून, दरांचे सुसंगतीकरण करून आणि यंत्रणेला अधिक न्याय्य तसेच वृद्धी-केंद्रित बनवून हा प्रवास सुरु ठेवणाऱ्या #NextGenGST सुधारणांचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले आहे. या उपाययोजनांना भारताची कणखर वित्तीय शिस्त पूरक ठरली असून त्यातून आपण जागतिक स्तरावर विश्वास कमावला आहे तसेच त्याचे पर्यवसान सार्वभौम पत मानांकनात  अधिक सुधारणा होण्यात झाले आहे.

एक्स मंचावर विजय यांनी लिहिलेल्या एका संदेशाला प्रतिसाद देताना, मोदी लिहितात:

“गेले दशक भारताचे आर्थिक परिदृश्य बदलून टाकणाऱ्या धाडसी सुधारणांचे होते, ज्यामध्ये गुंतवणुकीला अधिक चालना देणाऱ्या कॉर्पोरेट कर कपातीपासून, एकीकृत बाजारपेठेची निर्मिती करणाऱ्या जीएसटीपर्यंत तसेच जीवनमानातील सुलभता वाढवणाऱ्या वैयक्तिक आयकर सुधारणांपर्यंत अनेक सुधारणांचा समावेश होतो.

#NextGenGST सुधारणांनी हा प्रवास पुढे सुरु ठेवून यंत्रणा अधिक सुगम, न्याय्य आणि अधिक वृद्धी-केंद्रित करत आहेत तर आपल्या वित्तीय शिस्तीने जागतिक स्तरावर विश्वास तसेच अधिक चांगले पत मानांकन कमावले आहे.

या प्रयत्नांसह, आपण विकसित भारतासाठी अधिक मजबूत पाया घालत आहोत.”

 

* * *

निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2164014) Visitor Counter : 3